व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड सातारा
माजी सैनिक प्रशांत कदम यांचा कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मंगळवार रोजी विधानसभे साठी कराड विजय दिवस चौक येथे विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून सर्व माजी सैनिकांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला.
निवडणूक सैनिकांच्या न्याय व हक्कासाठी लढणार
ही विधानसभेची निवडणूक सैनिकांच्या न्याय हक्कासाठी तसेच समस्या सोडवण्यासाठी लढत आहोत तसेच आजी/माजी सैनिक त्यांचे कुटुंबीय,शहीद जवान कुटुंबिय शेतकरी, बहुजन युवा वर्गाच्या हक्कासाठी व गेली अनेक वर्षे सैनिक व सैनिकांच्या समस्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी सोडवल्या नाहीत व त्या सोडवण्यासाठी व सैनिकांच्या हक्कासाठी या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत.असे माजी सैनिक प्रशांत कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघातून माजी सैनिक संतोष यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे . निश्चितच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता सैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पाटील,माजी सैनिक राजकुमार शिंदे,गोरख पाटील,उमाजी सुर्यवशी,सर्जेराव देसाई, सदाशिव नागणे,भीमराव सावत, शहीद जवान वीर पुत्र सुरज जगताप, माजी सैनिक मनोज शिंदे,राजाराम माळी,राजेंद्र शेवाळे, महेश जाधव, हनुमंत शिरतोडे, कृष्णा पाटील, संजय घाडगे, दादासो देशमुख ,हनुमंत पाटील,शंकर कुंभार ,संतोष यादव, विश्वास शेवाळे, सुधीर जाधव, रवींद्र घाडगे, हनुमंत बिचकर, रवींद्र पवार, रवींद्र पाटील, तानाजी पवार, बाबासो पवार, अर्जुन बोराटे, गोरख साळुंखे,सर्व माजी सैनिक बहू संख्येने उपस्थित होते.