तीर्थक्षेत्र चाफळ येथील सीतामाई यात्रा सुरळीत शांततेत पार पाडण्यासाठी सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले. यावेळी तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रसाद भुतकर, तारळे सिंचन उपविभागाचे कनिष्ठ अभियंता संपत पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल घाडगे, विश्वस्त एल . एस. बाबर, अनिल साळुंखे, व्यवस्थापक भा.मा.सुतार, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन भोसुरे, पोलीस पाटील सागर चव्हाण मंडल अधिकारी प्रकाश गाडे, तलाठी महेश घोरपडे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र चोरगे तसेच उत्पादन शुल्क, वीज कंपनी, एसटी महामंडळ, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. टोम्पे म्हणाले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळला ऐतिहासिक महत्त्व आहे. मकर संक्रांतीला हजारोंच्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी येत असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुचित प्रकारांवर निर्बंध घातले जाणार आहेत.यासाठी पोलीस यंत्रणेने योग्य नियोजन करावे. आदल्या दिवशी उत्तरमांड धरणातून नदीपत्रात पाणी सोडण्याचा आणि विद्युत विद्युत पुरवठा यात्रा काळात खंडित न करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. तसेच यात्रेसाठी बाहेरून येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था, भाविकांना पिण्यासाठी पाणी या सोयींकडे विशेषत लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच विश्वस्त एल .एस .बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.