माण तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व प्रशासन गतिमान करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे : लक्ष्मण पिसे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व प्रशासन गतिमान करण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन
माण पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी सर्व शिक्षकांना केले.
नुकतेच माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत हे सेवानिवृत्त झाल्याने गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते .त्याठिकाणी नुकतीच पिसे यांनी माण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माण तालुका शिक्षक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी ते पुढे म्हणाले की, माण तालुक्यात अनेक रत्ने आहेत ,राज्यात प्रशासकीय सेवेत माण तालुक्यातील अनेक अधिकारी आहेत.त्यामुळे माण हा गुणवत्तेची खाण आहे.तालुक्यात प्रशासकीय कामात योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळाल्यास यश नक्की मिळते.प्राथमिक शिक्षकाला समाजात उंचीचे स्थान मिळाले पाहिजे असे सांगून प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची अपेक्षा शिक्षक समितीचे पदाधिकारी यांचेकडे व्यक्त केली,.
यावेळी अध्यक्ष घोडके यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख नारायण आवळे ,नंदकुमार तुपे,हणमंत जगदाळे,प्रताप अडसर, सुशील त्रिगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा जिल्हा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष श्रीकांत दोरगे , माण तालुका समितीचेअध्यक्ष संतोष घोडके ,
माण तालुका शिक्षक नेते राजेंद्र कदम, तालुका नेते नंदकुमार तुपे ,प्रतापसिंह आडसर ,शिक्षक बँकेचे मा. व्हाईस चेअरमन हणमंतराव जगदाळे, केंद्रप्रमुख नारायणजी आवळे , शिक्षक बँकेचे संचालक विजय बनसोडे, नितीन काळे,कराड पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक
एमडी दडस ,माण तालुका शिक्षक समितीच्या महिला नेत्या सौ संगीता दडस , सातारा जिल्हा शिक्षक समितीचे विभागीय उपाध्यक्ष महादेवजी महानवर ,शिक्षक समिती चे प्रवक्ते सुशील त्रिगुणे,माण तालुका शिक्षक समितीचे उपाध्यक्क्ष नवनाथजी खरात , अशोक भोसले, आकाराम ओंबासे, कार्याध्यक्ष सूर्यकांत दडस, कोषाध्यक्ष प्रमोद मंगरूळे, मा कार्याध्यक्ष महादेव चव्हाण ,जयकुमार काळे, सुरेश खांडेकर पैठणे , विजय शिंगाडे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम डी दडस यांनी केले.