शिंपी समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना – आमदार जयकुमार गोरे यांचा जाहीर सत्कार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी) –
माण-खटावचे लोकप्रिय आमदार सन्माननीय जयकुमार गोरे यांच्या अथक परिश्रमातून शिंपी समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण घडामोडीनिमित्त, त्यांच्या निवासस्थानी शिंपी समाज बांधवांकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाच्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ना.स.प. सन्माननीय इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेला शाल, पुष्पहार अर्पण करून आणि पेढे वाटून आमदार जयकुमार गोरे यांना सन्मानित करण्यात आले.