माहेरहून पैसे आणनेच्या कारणावरुन जाचहाट, छळ केल्याने पळशी _ ता. माण येथील विवाहितीने आत्महत्या
व्हिजन२४ तास न्युज
BY; Ahmad Mulla
म्हसवड :
माहेरहून पैसे आणनेच्या कारणावरुन जा- चहाट, छळ केल्याने पळशी _ ता. माण येथील विवाहितीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत म्हसवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी पळशी ता. माण येथिल विवाहिता सौ. पुजा सुरज खाडे वय २० वर्षे हिने मौजे पळशी ता. माण जि. सातारा गावी तिचे सासरी त्यांचे घराच्या बाजुस अस- लेले बाथरुम मध्ये तिचा पती सुरज संजय खाडे, सासरा संजय मारुती खाडे व सासु वंदना संजय खाडे सर्व रा. पळशी ता.माण जि.सातारा यांचे जाचहाट व त्रासाला कंटाळुन राहते घरी साडीचे साह्याने गळफास लावुन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर घटनेची फिर्याद विवाहित महिलेचे वडील चंद्रकांत मधुकर खरमाटे, वय – ४२ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर, जात – हिंदु वंजारी रा. पळशी ता.माण जि.सातारा यांनी म्हसवड पोलिसात दिली आहे.फिर्यादीत त्यांनी विवाहितेचा पती सुरज संजय खाडे, सासरा संजय मारुती खाडे व सासु वंदना संजय खाडे सर्व रा. पळशी ता.माण जि.सातारा यांचे जाचहाट व त्रासाला कंटाळुन साडीचे साह्याने गळफास लावुन आत्महत्या केली आहे. सदर आत्महत्येस तीचा पती, सासु व सासरा जबाबदार असल्याचे म्हंटले असून सदर गुन्ह्यात सदर गुन्ह्यातील आरोपी हे तात्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास PSI भंडारे सो हे करित आहेत.