नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

पाटण: प्रतिनिधी
श्रीकांत जाधव

नाडे-नवारस्ता:

पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

    या अश्वारुढ पुतळ्याची उंची ९ फूट असून हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाडे येथे उभारण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब म्हणाले.

     यावेळी आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे साहेब , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष यशराज देसाई (दादा), समितीचे उपाध्यक्ष विजय पवार आदी उपस्थित होते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!