निळेश्वर माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी.
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा कराड प्रतिनिधी
कुलदीप मोहिते
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित निळेश्वर माध्यमिक विद्यालय, वडोली निळेश्वर येथे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री सुरेश संकपाळ (भाऊ) यांच्या प्रेरणेने आणि निळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.सचिन नलवडे सर यांच्या मार्गदर्शनाने पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली.
शालेय परिसरातील सर्व कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. गोळा केलेला कचऱ्याचा ढीग तयार करून त्याच्या सभोवती रांगोळी काढण्यात आली. इयत्ता आठवीतील अंश पवार आणि यश कदम या विद्यार्थ्यांनी त्या होळीचे पूजन करून होळी पेटवली.

शाळेमध्ये ज्याप्रमाणे आपण पर्यावरण पूरक होळी साजरी केली तशीच होळी सर्व विद्यार्थ्यांनी गावामध्ये साजरी करावी असे आवाहन श्री.नलवडे सर यांनी विद्यार्थ्यांना केले.
ज्या पद्धतीने आपण शालेय परिसरातील कचरा जाळून नष्ट केला तसाच आपल्या मनातील वाईट विचारांच्या कचऱ्याची होळी विद्यार्थ्यांनी करावी असे आवाहन नलवडे सर यांनी केले. प्लास्टिक मुक्त वाढते प्रदूषण जागतिक तापमान वाढ याविषयी विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रबोधन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती काम हाती घेतले पाहिजे असे मत मुख्याध्यापक सचिन नलावडे यांनी व्यक्त के
या होळीच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.