इंजि.सुनील पोरे यांच्या प्रेरणेने म्हसवड मधील युवकांचीअकरा मारुती दर्शन यात्रा संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
                    इंजि.सुनील पोरे यांच्या प्रेरणेने करणभैय्या पोरे मित्र मंडळ व जनश्री फौंडेशन आयोजित रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती दर्शन यात्रा युवकांना दैविक छंद जडण्यासाठी आयोजित केली होती येणार्या श्री हनुमान जन्मोत्सवाचे पार्श्वभूमीवर दि ४/४/२०२३ रोजी म्हसवड परिसरातील १०२ युवकांनी सहभाग घेतला होता सकाळी म्हसवड महात्मा फुले चौकातुन अकरा गाड्यांचा ताफा रवाना झाल्या चाफळ जवळील दोन,शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज,मसूर,शहापूर,बहे बोरगांव, बत्तीस शिराळा, पारगांव, मनपाडळी,   या अकरा मारुती स्थानास भेट देऊन मनोभावे सर्वांनी पूजाअर्चा करून दर्शन घेऊन नामस्मरण केले
              ठिकठिकाणी या भाविक भक्तांचे पोरे कुटुंबीयांचे स्नेही मंडळींकडून फ्लेक्स बोर्ड लाऊन स्वागत सत्कार करण्यात आले विशेषतः मसूर येथे सरपंच व मित्र मंडळ सुनील जगदाळे, गणेश वेल्हाळ,सतिश जगदाळे आदींनी दुपारच्या भोजनाची चोख व्यवस्था केली होती कोडोली पारगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सुर्यवंशी यांनी तर बहे येथे रिटायर्ड जिल्हा वन अधिकारी पाटील यांनी त्यांचे पेट्रोल पंपावर सर्वांचा सत्कार करून सरबत चहापान व्यवस्था केली. रात्री आष्टा येथील हाॅटेलवर रात्रीचे जेवणानी सांगता झाली या यात्रा नियोजना बद्दल सर्वत्र पोरे कुटुंबीयांचे कौतुक होत आहे या दौरा नियोजन करणभैय्या पोरे, अँड शुभम पोरे, नगरसेवक संजय सोनवणे, बाळासाहेब पिसे, रोहीत टकले, छोटू गोंजारी,बाबु मुल्ला,आकाश मेंढापुरे, प्रवीण केवटे, अजिंक्य विधाते,आदींनी योग्य प्रकारे नियोजन केले होते हा सर्व प्रवास सुमारे चारशे किलोमीटर झाला*

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!