इंजि.सुनील पोरे यांची रुग्णवाहिका ज्ञानेश्वर माऊलींच्या वारी सेवेत
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
माऊली फौंडेशन मुंबई मार्फत वारकरी यांना मोफत वैद्यकीय सेवा व अन्नदान ही सुविधा अध्यक्ष डॉ शिंगण व कार्याध्यक्ष अॅड विश्र्वनाथ टाळकुटे यांचें नेतृत्वाखाली माऊली फौंडेशनच्या सर्व सदस्य सालाबादप्रमाणे वारीत सेवा बजावत असतात त्यांचा शुभारंभ बुधवार दि २१/६/२०२३रोजी फलटण येथे नामदेव शिंपी समाजोन्नती परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे हस्ते माऊली प्रतिमेचे पूजन व प्रातिनिधिक काही वारकरी यांना मोफत अन्नदान व वैद्यकीय सेवा देऊन करणेत आला
या वेळी इंजि सुनील पोरे यांचे प्रेरणेने सुरू असलेली रुग्णवाहिका देखील या माऊली फौंडेशन मुंबई मार्फत राबविले जाणाऱ्यां वैद्यकीय सेवेच्या दिमतीला देणेत आली या बद्दल माऊली फौंडेशन कार्याध्यक्ष अॅड विश्र्वनाथ टाळकुटे मुंबई हायकोर्ट यांनी इंजि पोरे यांचे कौतुक करून धन्यवाद दिले या वेळी चंद्रशेखर हेंद्रे,श्रीकांत मुळे, फलटण शहर नासप अध्यक्ष करण भांबुरे,निलेश गाणबोटे, पत्रकार अरविंद मेहता,खलाटे अहमद मुल्ला, सुनील कांबळे वडूज, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी गनबावले, उषाताई पोरे, पद्मा टाळकुटे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ..