व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड: श्री सिद्धनाथ तीर्थयात्रा म्हसवड यांच्या सौजन्याने म्हसवड ते आयोध्या अशी तीर्थयात्रा काढण्यात आली असून या तीर्थयात्रेचा शुभारंभ म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला श्री सिद्धनाथ तीर्थ यात्रा यांच्या सौजन्याने म्हसवड ते आयोध्या या तीर्थयात्रेचा शुभारंभ म्हसवडचे मठाधिपती रविनाथ महाराज व नामदेव समाज शिंपी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी टूर मॅनेजर चित्राताई पोरे,मार्तंड गुरव ,भिकू पोरे रामचंद्र गुरव ,देवदारे, धनंजय कालेकर तसेच सातारा विटा खानापूर म्हसवड या भागातून आलेले यात्रेकरू यावेळी उपस्थित होते ही तीर्थयात्रा म्हसवड ते परळी वैद्यनाथ नागनाथ माहूर शेगाव चित्रकूट प्रयाग काशी गया मथुरा हरिद्वार गोकुळ दिल्ली ते आयोध्या अशी 18 दिवस चालणार असून या तीर्थयात्रेमध्ये महिला व पुरुष असे शंभर यात्रे करू सहभागी झालेले आहेत. ही तीर्थयात्रा आयोजनाबद्दल इंजि. सुनील पोरे यांनी संयोजकाना धन्यवाद दिले व सामाजिक बांधिलकी मधून काढण्यात आली असून तीर्थ यात्रेला जाणाऱ्या यात्री करुनी चित्रा पोरे यांना या समाज कार्याबद्दल धन्यवाद दिले आहेत