इंजि. सुनील पोरे वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.*

बातमी Share करा:

म्हसवड :

इंजि. सुनील पोरे 

*सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात 34 वर्षे प्रामाणिकपणे सर्व्हिस करून, सामाजिक कार्यात रमणारे—*
*शुभम ग्रुप ऑफ बिझनेस व जनश्री फाउंडेशन म्हसवडचे जनक असलेले—*
*नामदेव समाजोन्नती परिषदेच्या माध्यमातून, सातारा जिल्हा अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे—*
*निर्भिड, निःस्वार्थी, निगर्वी असणारे आणि नेहमीच सेवाकार्यात आघाडीवर राहणारे—*
*माण विधान सभा मतदार संघाचे पाणीदार आमदार आदरणीय जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी असलेले—*
*मात्र सौ सुवर्णा (पत्नी) वहिनी यांच्या सुखी संसारात रममाण झालेले, माझे मित्र श्री सुनील पोरे यांचा आज वाढदिवस..!*
*चांगले ध्येय–*
*चांगली भूमिका—*
*चांगले विचार असणारे लोक—*
*नेहमीच आठवणीत राहतात..!*
*मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही!!!*
*खरंतर सुनील पोरे यांचेबद्दल मी काय लिखाण करणार ? ?*
*मला मात्र अभिमान आहे की, स्वच्छ मनाचे, चांगल्या विचारांचे, ध्येयवेडा असलेले आणि प्रेमळ स्वभावाचे जाणवलेले, मला आज मित्र मिळाले आहेत..!*
*मूळचे म्हसवडचे असले तरी, म्हसवडसाठी आणि सातारा जिल्ह्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलं असावं, असे मला वाटतेय.*
*याचे कारण म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात सेवाकार्याच्या माध्यमातून, सुनील पोरे नेहमीच आघाडीवर असतात.*
*जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून—*
*श्री सुनील पोरे आणि कुटुंबीयांनी—*
*गोरगरिबांना साथ व आर्थिक सहकार्य करणं,*
*मेडिकल चेकअप कॅम्प घेणं,*
*उच्चांकी रक्तदान शिबिरे घेणं,*
*कोरोनाग्रस्त काळात पीडितांना सहकार्य करणं तसेच रुग्णांसाठी स्वतःची अँब्युलन्स मार्फत विनामूल्य सेवाकार्य करणं,*
*वारकरी संत मंडळींचा यथोचित सन्मान व सहकार्य करणं,*
*रस्त्यांची दुरवस्था दाखवून तसेच म्हसवड शहरासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून सरकार दरबारी न्याय मिळवून देणं,*
*या परिवारास राजकीय वलय जरी असले, तरी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र आणि धार्मिक कार्यात कधीच राजकारण न करणारे आणि सतत सेवाकार्यात मग्न असणारे,*
*अशा कितीतरी घटनांचे,*
*आपण सर्वजण साक्षीदार आहोत.*
*खरं सांगू का, सुनील पोरे यांना–*
*” घेण्यापेक्षा देणं माहीत आहे “*
*म्हणूनच अशा व्यक्तींच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहून साथ करीत असते. एवढेच नव्हे तर चिरंजीव करण व शुभम सारखी मुलं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असलेली जाणवतात.*
*मला तर सुनील पोरे म्हणजे चंदनाचं खोडच असावं, असं खात्रीनं सांगावंसं वाटतंय.*
*सतत दुसऱ्यासाठी झिजत राहणं आणि सुगंध देत राहणं!!!*
*खरं सांगू का, अशाच व्यक्ती अर्थात श्री सूनील पोरे– मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही नेहमीच आठवणीत राहतात!!!*
*घरातील जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या सौ सुवर्णा (पत्नी) वहिनी यांची आयुष्यभराची साथ म्हणजे संसारातील स्वर्गसुखच की..!*
*खरंतर या ससांरातील स्वर्गसुखाचे मुख्य मानकरी आपण स्वतः जरी असला, तरी खरे विश्वस्त चिरंजीव करणसह सूनबाई सौ राजलक्ष्मी व चिरंजीव शुभमसह सूनबाई ॲडव्होकेट सौ प्राजक्ता आणि कन्या डॉक्टर सौ स्वप्ना सुपेकर व मुलाप्रमाणे असणारे जावई डॉक्टर राजेश्वर सुपेकर म्हणजे आपल्या सुखी संसारातील आधारस्तंभच की..!*
*शिवाय सोबतीला खोडकर नातवंडं आहेतच की!!!*
*!!! शब्दविराम !!!*

*पुन्हा एकदा शुभेच्छा देत असताना, नामदेव समाजोन्नती परिषदेचे, मुख्य विश्वस्त श्री राजेंद्रजी पोरे तसेच अध्यक्ष श्री संजय नेवासकर, ना स प चे सरचिटणीस श्री अजय फुटाणे आणि सर्व विश्वस्त, नातेवाईक, मित्रपरिवार आणि मला सुध्दा खूप खूप आनंद होत आहे.*

दिलीपकाका लंगडे
मसूर(कराड)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!