४ लाखांहून अधिक रकमेचा अपहार करणारा मॅनेजर अखेर जेरबंद म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, प्रतिनिधी –
यश पेट्रोल पंप, म्हसवड येथील 4 लाख 11 हजार 279 रुपयांच्या अपहारप्रकरणी फरार असलेल्या मॅनेजरला म्हसवड पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली. सदर आरोपी रणजीत नवनाथ सरगर (रा. दीडवाघवाडी, ता. माण, जि. सातारा) याने 6 ते 8 जून 2025 दरम्यान पेट्रोल-डिझेल विक्रीच्या रकमेचा अपहार केला होता.
या प्रकरणी यश पेट्रोलियमचे जनरल मॅनेजर दुर्गेश पांडुरंग शिंदे यांनी 17 जून रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
मुंबई, पुणे, सोलापूरसह विविध जिल्ह्यांत शोधमोहीम राबवून, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व इतर साधनांच्या आधारे आरोपी सोलापूर-सातारा सीमेवर असलेल्या बचेरी गावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेषांतर करून त्याचा पाठलाग केला आणि यशस्वीपणे अटक केली.
आज आरोपी रणजीत सरगर याला म्हसवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार नीता पळे यांच्या मार्फत सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी अटकेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पो.ह. नीता पळे, भास्कर गोडसे, महावीर कोकरे, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, वसीम मुलानी, सतीश जाधव, अभिजीत भादुले व दया माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.