दहिवडी येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेत १३ लाख १ हजार ६२५ रु चा अपहार,  मुख्याध्यापकासह अधीक्षकावर गुन्हा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
                 दहिवडी येथील अपंग व पुनर्वसन संस्थेत संस्थेच्याच दोन कर्मचाऱ्यांनी १३ लाख १ हजार ६२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी  अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक या दोघांविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
         याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी  दहिवडी येथील अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेमार्फत अस्थिव्यंग मुलांची निवासी शाळा चालवली जाते. शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम गोफणे  (रा. सोमंथळी, ता. फलटण) यांनी व तात्पुरत्या स्वरूपात अधीक्षक म्हणून कामास असलेले अमोल लांडगे (रा. खानोटा ता. दौंड जि. पुणे) याने दि. २४ मार्च २०२३ ते २० मे २०२३ या आपापसात संगनमत करून शाळेच्या ठरावाच्या खोट्या नकला व त्यांची वैयक्तिक कागदपत्रे बँक ऑफ महाराष्ट्रच्या दहिवडी शाखेमध्ये देऊन अकाऊंट काढले. त्यामध्ये संस्थेला समाज कल्याण विभागाकडून सहाय्यक परिपोषण अनुदानापोटी आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये हे संस्थेची कोणतीही संमती न घेता व संस्थेला कोणताही थांग पत्ता लागू न देता संबंधित रक्कम परस्पर खर्च करून संस्थेची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर संस्थेच्यावतीने सचिन प्रल्हाद देवकुळे (रा. दहिवडी) यांनी  दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  अधिक तपास दहिवडीचे सपोनि अक्षय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खाडे करत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!