म्हसवड शहर व पंचक्रोशीतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा : प्रभाकर देशमुख
म्हसवड ( प्रतिनिधी )
शेतीसाठी लागणाऱ्या विज पुरवठयात सुधारणा करुन म्हसवड शहर व पंचक्रोशितील शेती करीता योग्य दाबाने व नियमित वीज पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी साताराचे अधिक्षक अभियंता गायकवाड यांना माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी विविध मागणीचे निवेदन दिले या दिलेल्या निवेदनात म्हसवड येथील शेती वाहिनीतील अतिरीक्त सबस्टेशन देवापूर येथील मंजुर करणे व पालवन, गंगोती येथील दुसरे नविन सबस्टेशनला मंजुरी देणे, दिघंची ते म्हसवड येथील अतिरीक्त मंजुरी असलेली लाईन त्वरीत चालु करून द्यावी. धुळदेव व पळशी येथील शेती वाहिनी सतत ट्रिपिंग होत असल्याने लाईन मेंटनन्स करुन फॉल्ट काढुन व्यवस्थित वीज पुरवठा मिळावा, तसेच म्हसवड भवानी टेक येथील अतिरीक्त ट्रान्सफॉर्मर झालेला असुन त्याची विदयुत खांब शेतकऱ्याच्या शेतातुन जात असुन ते विदयुत खांब शेतकऱ्याच्या बांधावरुन घेण्यात यावेत.आदी मागण्या करण्यात आल्या असुन या प्रकारे योग्य नियोजन केल्यास म्हसवड शहरातील नागरीकांना व शेतकऱ्यांना योग्य दाबाचा व नियमित विद्युत पुरवठा होण्यास मदत होईल असेही देशमुख यांनी सांगीतले या वेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख माजी नगराध्यक्ष विलासराव माने , युवानेते अ़ॅड. पृथ्वीराज राजेमाने (गोविंदराजे ) ,चंद्रकांत केवटे ,सचिन लोखंडे ,आकाश माने, विलास रुपनवर आदी मान्यवर उपस्थित होते