डिजिटल मिडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या हक्कासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद ही स्वतंत्र शाखा पाच वर्षांपूर्वी सुरू केली असून याच्या अधिकृत राज्य कार्यकारिणीच्या निवड जाहीर झाल्या आहेत यामध्ये राज्याध्यक्षपदी बीडचे अनिल वाघमारे ,राज्य कार्याध्यक्षपदी साताराचे संतोष (सनी) शिंदे यांची तर राज्य उपाध्यक्ष पदी शेगावचे अनिल उंबरकर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत पिंपरी चिंचवड येथे नुकतीच डिजिटल मीडिया परिषदेची राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली यादरम्यान या निवडी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी जाहीर केल्या आहेत सध्याचे युग डिजिटल युग असल्याने ही आधुनिक क्रांती ओळखून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक यांच्या संकल्पनेतून डिजिटल मीडियाची स्थापना करण्यात आली युट्युब फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी ही स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेने सुरू केल्याने राज्यातील हजारो पत्रकार या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत गेली पाच वर्ष सातत्याने काम करत असलेली डिजिटल मीडिया परिषद या स्वतंत्र शाखेला राज्याची हक्काची कार्यकारणी असावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून हालचाली सुरू होत्या यामध्ये पिंपरी चिंचवडच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत राज्याची कार्यकारणी करण्याचा निर्णय मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी घेतला होता त्यानुसार त्यांनी ही कार्यकारणी जाहीर करून राज्याला आता अधिकृत राज्य कार्यकारणी दिली आहे यापुढील काळात ही राज्य कार्यकारणी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन डिजिटल माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना एकजूट करणार आहे आणि त्यांना मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या डिजिटल मीडियाचे काम आणि त्यांची ध्येय धोरण सांगणार आहे डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी संतोष (सनी) शिंदे यांची निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक,शरद पाबळे राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, विभागीय सचिव गणेश मोकाशी, डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे पुणे विभागीय आधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी ,सरचिटणीस दीपक प्रवाळकर ,प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित आंबेकर, राज्य कार्यकारणी सदस्य विद्या महसुलीकर ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तपासे,शंकर मोहिते,ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीकांत कात्रे, राजेंद्र सोळसकर, आधीस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, डिजिटल मीडिया परिषद सातारा जिल्हा सचिव पद्माकर सोळवंडे, उपाध्यक्ष संग्राम निकाळजे, संघटक शरद गाडे, जिल्हा सदस्य विजय टाकणे,साहिल शहा, शक्ती भोसले,संदीप शिंदे, यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहॆ