भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सातारा जिल्हा चिटणीस पदी मीनाक्षीताई पोळ यांची निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते कराड

सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सातारा जिल्हा चिटणीस पदी ,मीनाक्षी बबनराव पोळ यांची निवड करण्यात आली आहे.

    दिनांक 12.1.2024 रोजी शासकीय विश्रामगृह सातारा येथे, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील( दादा) कदम, कराड उत्तरचे नेते मनोज (दादा) घोरपडे कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस( दादा) जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मीनाक्षी बबनराव पोळ, यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सातारा जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली.

मीनाक्षीताई पोळ् ह्या कामगारांच्या मूलभूत सुविधा व समस्यांसाठी लढा देत असतात. त्यांनी अनेक कामगार उपयोगी योजना राबवल्या आहेत, समाजातील असंघटित कामगारांना मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी गावोगावी जाऊन, त्यांच्या हक्काचे मिळाले पाहिजे, यासाठी मीनाक्षीताई पोळ यांची धडपड चालू असते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा सातारा जिल्हा चिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश सदस्य, अली अहमद आगा कराड उत्तर विधानसभा संयोजक महेश (बाबा) जाधव, कराड तालुका अध्यक्ष शंकर शेजवळ व मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित होता.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!