पर्यंती ता माण येथे  वयस्क माय लेकीचा गळा आवळून निर्घून खून 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
पर्यंती ता माण येथील संपताबाई लक्ष्मण नरळे वय ७५ व नंदाबाई भिकू आटपाडकर वय ५८ या माय लेकीचा काल रात्री अज्ञात व्यक्तीने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली ती आज सकाळी उघडकीस आली 
या बाबत घटना स्थळावरुन मिळालेली बातमी अशी
पर्यंती ता माण येथील संपताबाई लक्ष्मण नरळे वय  ७५ व नंदाबाई भिकू आटपाडकर वय  ५८ या दोघी एकत्र रहात असून त्यांचे गावातच एक छोटे किराणा दुकान आहे गावातील सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबध असून दोघीही विधवा आहेत संपताबाई यांना तीन मुली व दोन मुले आहेत एक मुलगा पुण्यात नोकरी करत असून एक पर्यंती गावातच वेगळा राहून शेती करत आहे  तसेच नंदाबाई यांना मुलबाळ नसून सावत्र दोन मुले आहेत ते घरापासून काही अंतरावर रहात आहेत
दि २१ रोजी सकाळी ७ वाजता नंदाबाई यांची नात भारती दाजीराम नरळे वय १८ ही किराणा दुकानात सामान घेण्याठी आली असता तिला दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले तीने आजीला हाक मारली असता कोणीच आवाज देत नाही हे पाहिल्यावर तीने घराचे दार ढकलले असता दोन्ही मायालेकी समोरच मृतअवस्थेत दिसून आल्या  ते दृश्य पाहून ती घाबरून ओरडत घरी येऊन घरात सांगितले  लगेच  तिचे वडील दाजीराम नरले यांनी   घटना  पोलीस पाटील यांना सांगीतली पोलीस पाटील यांनी या घटनेची खबर त्वरीत म्हसवड पोलीस ठाण्याचे एपिआय शिवाजी विभूते    यांना दिली
घटनेची माहीती समजताच ए पी आय  शिवाजी विभूते  यांनी या घटनेची खबर कोरेगावचे  उपविभागीय अधिकारी व दहिवडी विभागाचे प्रभारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना दिली ते सकाळी ७ वाजता सर्व फौज फाट्यासह घटना स्थळी हजर झाले घटनेचे गांभीर्य ओळखून स्थनिक गुन्हे शाखा , श्वान पथक , फिंगरप्रिंट एक्सपर्ट  यांना पाचारण करण्यात आले
श्वानपथकाने पर्यंती पासून दोन किमी अंतरावर मुल्ला वस्तीपर्यंत माग दाखवून परत आले  खुनाचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत मृतदेह शव विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!