श्री स्वामी विवेकानंद जयंती साप्ताहनिमित्त म्हसळा तालुका पत्रकार संघाचे मार्फत पाचवे पुष्प गुंफताना आयोजित क्रीडा स्पर्धाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्या हस्ते करण्यात आले.पत्रकार अशोक काते यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ केला.या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के, उदय कुमार कळस,महेश पवार,सुशील यादव,अरुण जंगम,वैभव कळस,संतोष उद्धरकर,विद्यालयाचे पर्यवेक्षक नेताजी गायकवाड,क्रीडा प्रमुख मोरे सर,कामडी सर,विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी समीर बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संतांचा आदर्श प्रत्येकाने समोर ठेऊन प्रत्येक क्षेत्रात उतुंग झेप घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशोक काते यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मोबाईल पासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.सुशील यादव यांनी हे विज्ञान युग आहे.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्पर्धा परीक्षाना सामोरे गेले पाहिजे आणि आपले ध्येय निश्चित केले पाहिजे.
अध्यक्षीय मार्गदर्शनात जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी करताना १९५० पूर्वी आपल्या भागात शिक्षणाची पुरेसी सोयी सुविधा नसल्यामुळे शैक्षणिक बाबतीत आपला भाग मागास होता त्यावेळी प.पूज्य.डॉ.बापूजी आपल्या भागात आले आणि त्यांनी पहाणी केली तर शैक्षणिक बाबतीत तालुक्याची दुरावस्था त्यांच्या लक्षात आली. आणि या भागातील खेडापाड्यातील गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घेता आले पाहिजे असा निश्चय करून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात शाळा सुरु करून खऱ्या अर्थाने शिक्षणाची दालने सुरु केली. संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचा आज वाढदिवस असून त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या मनावर संत संस्कृती रुजावी या विधायक हेतूने म्हसळा प्रेस क्लबच्या वतीने विद्यालयास संतांच्या जिवनावर आधारीत पुस्तके भेट दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेताजी गायकवाड यांनी केले.नीटनेटके सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले.