म्हसवड मधून अचानक बदली होऊन गेलेल्या कर्तव्यदक्ष सपोनि राजकुमार भुजबळ यांचा पोलीस पाटलांच्या पुढाकाराने म्हसवड दहिवडी मध्ये रक्तदान करून वाढदिवस साजरा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड:

           कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची बदली होऊनही पोलीस पाटलांच्या पुढाकाराने म्हसवड येथे ३०१ तर दहिवडी येथे १२७ असे माणदेशातील ४२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून तत्कालीन सपोनि राजकुमार भुजबळ यांचा वाढदिवस साजरा करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

            म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी गतवर्षी या पोलिस ठाण्याचा चार्ज स्वीकारला होता या एका वर्षामध्ये म्हसवड पोलीस ठाण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने करून खाकी वर्दीतील देव माणूस ही उपाधी त्यांना म्हसवड शहर व परिसरातील गांवानी दिली आहे

            त्यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रशासनावर पोलीस खाकीचा वचक ठेवत म्हसवड पोलीस ठाण्याचा कायापालट केला. पोलीस ठाण्या मध्ये त्यांनी गतवर्षी पोलीस पाटलांच्या सहकार्याने सुमारे ५०० वृक्षांची लागवड करून नंदनवन केले आहे पोलीस स्टेशनला अनेक वर्षापासून भेडसावत असणारे वॉल कंपाऊंड ही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून बांधकाम संपूर्णपणे करून घेतले असून हे पोलीस स्टेशन संपूर्ण जिल्ह्यात एक नंबरचे पोलीस स्टेशन असल्याची चर्चा पोलीस खात्यामध्ये आहे. गत वर्षांमध्ये म्हसवड शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम त्यांनी करत छोट्या-मोठ्या चोऱ्यांवर त्यांनी नियंत्रण आणले होते.तर दहिवडी येथे त्यांनी अशीच कामगिरी करत दहिवडी पोलीस स्टेशनचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता

             अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीची नुकतीच तडका फडकी सातारा येथे बदली करण्यात आल्याने म्हसवड शहर व परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असताना काल सात जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस म्हसवड पोलीस स्टेशन मधील गोपनीय विभागाचे अभिजीत भादुले ,म्हसवड पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या पोलीस पाटील यांनी पुढाकार घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये म्हसवड मध्ये ३०१ तर दहिवडी येथेही चैतन्य अकादमीच्या वतीने व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने १२७ असे एकूण ४२८ रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे हे समजून एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून अधिकाऱ्याची बदली होऊ नये त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हे केलेलं रक्तदान म्हणजे लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवले असल्याची चर्चा माण तालुक्यात सुरू आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!