अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवल्याने आपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे दंडात्मक कारवाई चे आदेश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड
   अल्पवयीन मुलांकडुन सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवणेचे प्रकार वाढत चालले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तरी अठरा वर्षा खालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारचे प्रबोधन गेले दोन महिने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील अधिकारी वेगवगळया शाळा व महाविदयालया मध्ये जाऊन करीत आहेत. तथापि सदर प्रकारामध्ये घट झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयामध्ये दि.०२.०३.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये अशा अल्पवयीन चालकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांचे कडून देण्यात आलेले आहेत त्यास अनुसरुन आज दिनांक ०३.०३.२०२३ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या यतीने वायुवेग पथकाने धडक मोहिम सुरु केली असून आजरोजी एकुण २० अल्पवयीन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन १२ वाहने जप्त केली आहेत.
सदरची मोहिम सांगली शहर व सांगली जिल्ह्या मध्ये सर्वत्र राबवणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच आपल्या १८ वर्षा खालील मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये. १६ वर्षा खालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला तर सदर गुन्हया मध्ये दोषी आढळणाऱ्या मुलाच्या पालकांना ३ वर्ष कारावास व २५,०००/- रुपये दंडाची तरतूद मोटार वाहन कायदामध्ये करण्यात आली आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास चालकास ५०००/- रुपये व वाहन मालकास ५०००/- रुपये
असा एकूण १०,००० रुपये दंड अशा शिक्षेची तरतुद मोटार वाहन कायदया मध्ये करण्यात आलेली आहे. तरी पालकांनी व अल्पवयीन पाल्यांनी यांची गांभीयाने दखल घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!