संजय भोसले यांचे प्रयत्नामुळे मल्हार पेठ ते पंढरपूर रस्त्यावर गतिरोधकांची व्यवस्था

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते

शिवडे उंब्रज: प्रतिनिधी

      संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) शिवडे ग्रामस्थ , हनुमान वाडी, ग्रामस्थ यांच्यावतीने केलेल्या निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेत.उपविभागीय अभियंता सा.बा.उपविभाग उत्तर कराड यांनी मल्हार पेठ ते पंढरपूर रस्त्यावर गतिरोधकांची व्यवस्था केली आहे

.     संजय भोसले शिवसेना तालुकाप्रमुख कराड उत्तर यांच्या नेतृत्त्वाखाली दि.21/12/2023 रोजी मा.उपविभागीय अभियंता सा.बा.उपविभाग उत्तर कराड यांना विविध मागण्यांचे बाबद निवेदन देण्यात आले होते त्यामध्ये मल्हारपेठ ते पंढरपूर रस्त्यावरील आपघात होणाऱ्या ठिकाणांवरती गतीरोधक किंवा वाहनांची गती कमी होणे साठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी व सुचणा फलक लावण्यात यावेत तसेच शिवडे फटा महाकुबाई मंदिरासमोर,हनुमानवाडी,वडोली, कोरेगाव फटा याठिकाणी गतीरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी कारण या ठिकाणी आजपर्यंत बरेच अपघात झालेले आहेत त्यामध्ये बऱ्याच लोकांना आपले जिव गमवावे लागले आहेत तसेच बरेच जण कायमचे अपंग झाले आहेत व या रस्त्यावर प्रवास करताना व स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांना याचा खुप त्रास होत असतो त्यामुळे शिवसेना व शिवडे, हनुमानवाडी च्या ग्रामस्थ यांच्या कडून त्या ठिकाणी गतिरोधक किंवा पर्यायी व्यवस्था करून द्यावी हि मागणी करण्यात आली होती व वेळोवेळी बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या व आंदोलन करण्याचा इशाराही संजय भोसले व शिवसैनिकांनी दिला होता

      मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम  विभाग कराड उत्तर यांनी शिवडे फाटा महाकुबाई मंदिरासमोर, हनुमानवाडी, वडोली, कोरेगाव फटा या ठिकाणी गतिरोधकांची व्यवस्था केली आहे त्यामुळे आता शिवडे हनुमानवाडी व परिसरातील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!