दहिवडीमध्ये शेतातील जनावरांच्या वादातून कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
दहिवडी प्रतिनिधी :
दहिवडी तालुक्यातील सावंतवस्ती-दहिवडी ते वरची खताळवस्ती दहिवडी मार्गावर काल (दि. 17 सप्टेंबर) दुपारी जनावरे शेतात चारायला आणू नकोस या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विश्वास ज्ञानदेव खांडे (वय 46, रा. खांडेवस्ती दहिवडी) हे आपल्या ट्रॅक्टरमधून मका घेऊन जात असताना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माऊली हॉटेलजवळ आरोपी प्रसाद नितिन साखरे (रा. खताळवस्ती, दहिवडी) याने त्यांचा अडवून वाद घातला. “जनावरे तिकडे चारायला आणू नकोस, तुला आता जिवंत ठेवत नाही,” असे म्हणत साखरे याने कोयत्याने विश्वास खांडे यांच्या पायावर, हाताच्या बोटावर आणि डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर 319/2025, कलम 109, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.  अधिक तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली   म.पो.उनि. सी.एस. मोटे हे करीत आहेत.

 गावात किरकोळ वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने दहिवडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *