डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती म्हसवड शहरात मोठ्या उत्साहाने साजरी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड /प्रतिनिधी :-
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली
आज सकाळी प्रथम पंचशील ध्वजाचे पुजन संयोजकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विहारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध, शाहू महाराज , म फुले, छ. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाबाई, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमानां उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून बुद्ध, धम्म, संघ वंदना कुमार सरतापे यांनी घेतल्या नंतर उपस्थितांनी महामानवाने अभिवादन केले



