डॉ.सुवर्णा दीदी इंडियन स्कूल अवॉर्ड्स २०२५ ने सन्मानित . सुप्रसिद्ध महिला कुस्तीगीर गीता फोगट यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी कुलदीप मोहिते
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या संचालिका, डॉ. सुवर्णा दीदी यांना मुंबई मधील कोर्टयार्ड मॅरियट हॉटेल मध्ये आयोजित पुरस्कार कार्यक्रमात सुप्रसिद्ध
महिला कुस्तीगीर गीता फोगट, यांच्या हस्ते अवॉर्ड्स २०२५ प्रदान करण्यात आला.
यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका डॉ. सुवर्णा दीदी यांना १०० विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून मान मिळाला तर 183 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयचे ध्यान धरणा प्रशिक्षक ब्रह्मकुमार डॉ. दीपक हरके, यांना भारताच्या प्राचीन राज योगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सुप्रसिद्ध महिला कुस्तीगीर यांच्या हस्ते इंडियन स्कूल अवॉर्ड्स 2025 प्रदान करण्यात आला. त्यामुळे डॉ. सुवर्णा डॉ. दीपक हरके, यांचे आध्यात्मिक स्तरातून सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ब्रह्मकुमारी ज्याला अधिकृतपणे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणून ओळखले जाते. ही वैयक्तिक परिवर्तन आणि जगाच्या नैतिक नूतनीकरणासाठी समर्पित एक जागतिक अध्यात्मिक चळवळ आहे. ही संस्था व्यक्तींना त्यांच्या खऱ्या ,आध्यात्मिक ओळखीच्या आकलनाच्या आधारे, त्यांच्या केवळ भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन स्वतःला बदलण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे शांततेच्या आणि प्रत्येक आत्म्याच्या वैयक्तिक प्रतिष्ठेच्या खोल सामूहिक चेतना विकसित करण्यास समर्थन देते.