पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली दि. 6 (जि.मा.का.) :
राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या शनिवार, दि. 7 जानेवारी 2023 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगली येथून मिरजकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थिती, स्थळ -श्री दत्त मंगल कार्यालय मिरज. सकाळी 11.45 वाजता श्री दत्त मंगल कार्यालय मिरज येथून जनसंपर्क कार्यालय मिरजकडे प्रयाण. दुपारी 12.30 ते 1.15 वाजेपर्यंत जनसंपर्क कार्यालय मिरज येथे कार्यालयीन कामकाज. दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित आंतरशालेय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ, स्थळ – विलिंग्डन कॉलेज मैदान सांगली. दुपारी 3.45 वाजता विलिंग्डन कॉलेज मैदान येथून दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगलीकडे प्रयाण. दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगली येथे राखीव. सायंकाळी 5.15 वाजता नेमिनाथनगर सांगलीकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता श्रीराम कथा व नामसंकिर्तन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – कल्पद्रुम ग्राऊंड, नेमिनाथनगर वाडीकर मंगल कार्यालयासमोर सांगली. सायंकाळी 5.45 वाजता नेमिनाथनगर सांगली येथून म्हैसाळकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता वारकरी, धारकरी, बारा बलुतेदार यांच्यामार्फत सत्कार समारंभास उपस्थिती, स्थळ – म्हैसाळ. सोयीनुसार दास बंगला निवासस्थान विश्रामबाग सांगलीकडे प्रयाण.