संघर्षातून आणी कष्टातून मिळवलेले यश आणी ज्ञान चिरकाळ टिकते सहज मिळवलेले ज्ञान हे तात्पुरतेच राहते : सजगाने
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
डॉ. सोफिया अहमद मुल्ला यांनी अनेक संघर्षातून व अपार कष्ट घेऊन डॉक्टरेट पदवी मिळवली व नागु विरकर यांनी हेडाम ही कादंबरी लिहून राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करून दोघांनी माण तालुक्याच्या नावलौकीकात भर टाकली असल्याचे प्रतिपादन विठ्ठल सजगाणे सर यांनी केले
म्हसवड येथील मोफत नगर वाचनालया तर्फे डॉ सोफिया मुल्ला व हेडाम कादंबरीचे लेखक नागु विरकर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमासाठी म्हसवड नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष व मोफत नगरवाचना लयाचे अध्यक्ष नितीनशेठ दोशी सचिव,सुरेश उबाळे ग्रथंपाल सुनिल राऊत व मोफत नगरवाचनालयाचे सदस्य महावीर व्होरा, जयंत राऊत, डॉ हेमलता शेटे, अनिल लोखंडे, सुशिल त्रिगुणे, भारत पिसे,लियाकत मोकाशीसर आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलतान सजगाणेसर पुढे म्हणाले
डॉ सोफिया मुल्ला यांनी आपले कुटुंब सांभाळून नोकरी करत करत अहोरात्र कष्ट करुन परिस्थितीशी संघर्ष करुन इंग्रजी विषयात पीएच डी पदवी मिळवली व मुस्लिम समाजात तालुक्यात एकमेव पीएच डी धारक बनल्या संघर्षातून आणी कष्टातून मिळवलेले यश आणी ज्ञान चिरकाळ टिकते सहज मिळवलेले ज्ञान हे तात्पुरतेच राहते त्यांच्या या ध्येय व चिकाटीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तर नागु विरकर यांनी आपल्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवत हेडाम हि कादंबरी लिहीली व त्याला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले अशा या दोन्ही विद्वान लोकांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या माध्यमातून इतरांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशानेच नितीन दोशी यांनी त्यांचा सत्कार घ्यायचे ठरवले आणी तेही ज्ञानाचे भांडारअसलेल्या नगरवाचनालयात या ज्ञानी लोकाचा सत्कार होत आहे हे अतिशय महत्वपूर्ण असल्याचे सजगानेसर यांनी सांगीतले माण तालुका हा अशा गुणवंताची खाणच असून या खाणीतील कोणताही हिरा चमकला की नितीन शेठ दोशीना त्यांचा खुप अभिमान वाटतो व त्यांच्यातून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने अशा गुणवंताना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा व त्यांना प्रेरणा देण्याचे महान कार्य गेली कित्येक वर्षे नितीनशेठ दोशी करत आहेत इतर कितीही सत्कार मिळू द्या पण नितीन दोशी यांचे हस्ते सत्कार होने लोकआपले भाग्यच समजत आहेत
यावेळी नितीनशेठ दोशी म्हणाले डॉ सोफिया मुल्ला यांनी अतीशय संघर्ष करुन संसार सांभाळून गाढा अभ्यासकरुन डॉक्टरेटची पदवी मिळवली पगार चालू नाही म्हणून त्यांनी शिक्षण द्यायचे थांबवले नाही त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ मोठ्या पदावर विराजमान आहेत त्यांच्या कुटुंबाशी माझा अतिशय जवळीकचा संबंध असून त्याचे सासरे चांदभाई मुल्ला यांची तत्वनिष्ठा एकनिष्ठा हे गुण घेण्यासारखे होते त्यांचेच संस्कार त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला लाभल्याचेही यावेळी नितीन दोशी यांनी सांगीतले तसेच दुसरे सत्कार मुर्ती नागु विरकर हे आपल्या हेडाम कादंबरीच्या लिखानातून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक मिळवला त्यांच्या पहिल्याच कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्यांच्या हातून असेच नवनविन लिखानाचे कार्य घडत रहावो अशी अपेक्षा व्यक्त केली
यावेळी सुशिल त्रिगुणे, सचिव सुरेश उबाळे, डॉ.सोफिया मुल्ला, अहमद मुल्ला यांनीही आपले मनोगते व्यक्त केली शेवटी सुशिल त्रिगुणे यांनी आभार मानले

