तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
म्हसवड – सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत तंबाखू विरोधी जनजागृती अभियानाचा शुभारंभ व तंबाखूचे दुष्परिणाम आणि वाढता कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती व लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष व सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव यांच्या वतीने सांगलीत तीन दिवस जनजागृती अभियानाचा शुभारंभ चित्ररथाचे उद्घाटन करून व कोटपा 2003 कायद्याच्या फलकाचे अनावरण करून करण्यात आले. त्याप्रसंगी माननीय जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद आलासकर जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. संतोष पाटील, व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, समुपदेशक सौ ज्योती राजमाने पोपट कांबळे गंगाराम कांबळे मालतेश तांदळे, आदी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जितेंद्र डूडी यांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्या व कोटपा 2003 या फलकाचे अनावरण केले यावेळी जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील जिल्हा सल्लागार डॉ. मुजाहिद सलाम मुंबई फाउंडेशन व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. संतोष पाटील मालतेश तांदळे, संताजी ठोंबरे आदी उपस्थित होते. छाया – चित्ररथाचे उद्धघाटन करताना जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी व सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कांबळे.