मंगळवेढा :प्रतिनिधी मंगळवेढा येथील शब्दकळा साहित्यसंघाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक डॉ. नंदकुमार राऊत यांचे आत्मचरित्रपर पुस्तक ‘दौशाड’ याला “शब्दकळा राज्यस्तरीय पुरस्कार २०२४” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
प्रस्तूत कार्यक्रमाचे सन्मानिय अध्यक्ष मा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी पालक मंत्री सोलापुर, मा. आमदार समाधान अवताडे, मा. आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शशिकांत जाधव, तसेच म्हसवडचे प्रसिध्द ह्रदय रोग तज्ञ डॉ. प्रमोद गावडे, तसेच राऊत नर्सिंग होम चे सर्वेसर्वा डॉ. टी. जी. राऊत (सर्जन), हनुंमत राऊत, वैभव गायकवाड, तसेच भास्कर कंधर, करमाळा येथील भास्कर भांगे उपस्थित होते. दौशाड या पुस्तकास या वर्षी प्राप्त झालेला तिसरा पुरस्कार आहे. यापुर्वी साहित्यवलय हा राज्यस्तरीय पुरस्कार, ठाणे येथे प्राप्त झाला आहे. तसेच गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा “निळु फुले वाडमयीन पुरस्कार” नुकताच जाहिर झालेला आहे. दौशाड या वनस्पतीप्रमाणे कठीण प्रसंगी कसं टिकुन रहायच हे डॉ. नंदकूमार राऊत यांनी त्यांच्या वाटेला आलेल व त्यांनी भोगलेल, दुख त्यांचा आणि त्यांचा कुटुंबाचा प्रवास तसेच त्यांची पत्नी श्रीमती मोनिका राऊत या गृहिणी असतांना त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना लग्नानंतर घडवीले आहे. सदर पुस्तक हे पुण्यातील नामांकीत राजहंस प्रकाशन संस्था, पुणे यांनी प्रकाशीत केले आहे. माण या दुष्काळी तालुक्यातील वावरहिरे या एका खेड्यातील गरीब मुलगा स्पर्धा परिक्षा देऊन अधिकारी कसा बनतो आणि मंत्रालयात अधिकारी होतो व स्वतःच्या पत्नीला प्रोत्साहित करून एक मुलगी झाल्यानंतर एका गृहणीची थेट पोलिस उपअधिक्षक (DYSP) लग्न झाल्यानंतर निवड कशी होते, हा प्रवास शब्दबध्द केलेला आहे. एखाद्या स्त्रीच्या पाठीमागे ठामपणे पुरूष उभा राहिल्यास ती काहीही करू शकते याच वर्णन त्या पुस्तकात केलेले आहे. (गृहिणी ते पोलिस अधिक्षक/शुन्य ते पोलिस अधिक्षक) असा आहे. तसेच त्यांचा “कंजाळ” हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून त्यांच्या साहित्यीक कामगीरीचे सर्वत्र कौतूक होत असून. नातेवाईक, मित्रवर्य तसेच सर्व जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.