क्रांतिवीर संकुलात डॉ. नागनाथअण्णा यांची जयंती उत्साहात साजरी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड.. प्रतिनिधी
थोर स्वातंत्र्य सेनानी, पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी यांची 101 वी जयंती विविध उपक्रमाच्या माध्यमातून म्हसवड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.प्रारंभी क्रांतीवीर शैक्षणिक संकुलामध्ये वंदनीय नागनाथ अण्णांच्या प्रतिमेची पूजन संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांचे हस्ते करण्यात आले .यावेळी संस्था सचिव सुलोचना बाबर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव दहिवडे, प्राचार्य राहुल फुटाणे ,संकुलातील सर्व शाखाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यानिमित्ताने सजवलेल्या गाडीवर क्रांतिवीर अण्णांची फोटो प्रतिमा ठेवून म्हसवड शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय,. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा , क्रांतिवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल,. नूतन मराठी शाळा या शाखा मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने व उत्साहात सहभागी झाले होते .क्रांतिवीर नागनाथ अण्णाअमर रहे, नागनाथ अण्णांचा विजय असो, सामान्य जनतेचा नेता कैसा हो नागनाथ अण्णा जैसा हो .या व इतर घोषणा विद्यार्थ्याकडून मोठ्या उत्साहात देण्यात आल्या .
या मिरवणुकीतील लेझीम पथक, झांज पथक, तसेच भली मोठी लांबच्या लांब प्रभात फेरी हे विशेष आकर्षण ठरले, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या घोषणामुळे. म्हसवड मधील नागरिकांनी उस्फूर्त आनंद व्यक्त केला .या मिरवणुकीत संकुलातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्राचार्य विठ्ठल लवटे,प्राचार्य राहुल फुटाणे,मुख्याध्यापक अनिल माने व सुभद्रा पिसे,तसेच क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे व चंद्रकांत तोरणे यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षकांनी मिरवणूक उत्साहात पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.