क्रांतिवीर संकुलात डॉ. नागनाथ अण्णा यांचा स्मृतिदिन साजरा.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड ..प्रतिनिधी
       थोर समाजसेवक पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथ अण्णा नायकवडी यांचा 12 वा स्मृतिदिन क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
               क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे नागनाथ अण्णांचा 12 वा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केलेला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव तसेच संकुलातील  शिक्षक , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


     यावेळी बोलताना प्रा. विश्वंभर बाबर म्हणाले स्वर्गीय नागनाथ अण्णा हे 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण स्वातंत्र्य सेनानी होते.प्रति सरकार च्या काळातील क्रांतिकारक, तसेच शाहू, फुले , डॉ.आंबेडकर यांच्या कृतीशील विचाराची वारसदार होते.अण्णा हे धरणग्रस्त, दुष्काळग्रस्त व पाणी चळवळीचे आधारस्तंभ होते. शेतकरी कष्टकरी जनतेसाठी त्यांनी प्रचंड काम उभे केले., शिक्षण व सहकारामध्ये वाळवा पॅटर्न ची निर्मिती केली.वंचित व बहुजन समाजासाठी अण्णांचे कार्य उल्लेखनीय असल्याची माहिती प्रा. बाबर यांनी दिली. अण्णांच्या नावे म्हसवड येथे क्रांतिवीर शैक्षणिक संकुल उभे केलेअसून त्यामध्ये 2 हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असल्याने त्याचा मला रास्तअभिमान आहे. संकुलाच्या माध्यमातून क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या विचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे काम सुरू असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले..
         या निमित्ताने शाळेतील शौर्य माने, तुषार घुटुकडे, सौम्या पोळ, तनिष्क विरकर, अजिंक्य राऊत, सृष्टी सावंत या विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर अण्णांच्या जीवन कार्या बाबतचे मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौर्या सरतापे व संस्कृती माने या विद्यार्थ्यांनी केले तर उपस्थितांचे आभार सृष्टी लुबाळ हिने व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!