पाण्यापासून वंचित गावे व जनतेचा टाहो सरकारला ऐकू येत नाही काय- संजय भोसले*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
बिजवडी
माण खटाव तालुक्यातील अर्धशतकभर गावे व वाड्यावस्त्या कोणत्याच योजनेमध्ये समाविष्ट नसताना सरकार मात्र पाणी पूजनांचा स्टंट करते आहे, या सरकारला पाण्यापासून कायम वंचित राहिलेल्या जनतेचा टाहो का ऐकू येत नाही असा जहरी सवाल शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्राद्वास केला आहे.
शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचे रिमोट कंट्रोलने चालणारे युती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दुष्काळी तालुक्यांच्या गांव व वाड्या वस्त्यावरील जनता व येथील दुष्काळ नजरेसमोर ठेऊन जिहे कठापूर, उरमोडी,टेंभू, तारळी सह अनेक योजनांना पैसै देऊन त्या तात्काळ मंजूर केल्या व पाया रचला यापाठीमागील उद्देश देखील संपूर्ण दुष्काळी तालुके कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करणेचा होता याचे श्रेयदेखील भूमिपूत्र मा.खा.हिंदूराव निंबाळकर,मा.आ.येळगांवकर, डाॅ.कापसे यांचे आंदोलनाला जातो यामध्ये मी स्वत: पाणीप्रश्नासाठी वेळप्रसंगी जेल भोगलेली आहे.
युती सरकार गेले आणी योजना रखडल्या आणी आजही अर्ध्याहून अधिक तालुके टँकरवरती अवलंबून आहेत याला जलपूजनाचे श्रेय घेणारे सरकार व १९९९ पासूनचे लोकप्रतिनिधी जबाबदार नाहीत काय ? असा सवाल देखील भोसले यांनी व्यक्त करतानाच ते पुढे म्हणाले की, पैसा व पैस्यातून राजकारण करणारांमुळेच गावगड्यातून दारु, जुगार,सावकारकी करणारे कार्यकर्ते यांची बळकटी हेच धोरण सामान्य माणसांचा आवाज दाबत असून यात भर प्रशासनाची असलेमुळेच खोटे ढोल बढवत जनतेच्या मुळावरती उठलेल्या पेडन्यूजर आणी दलबदलू व चाटू संभाव्य पुढार्यांमुळेच गेली २५ वर्षे बिजवडी परिसरासह माण खटावमधील अर्धशतकभर गावे आजही दुर्भिक्षिताचे भयावह जीवन जगत आहेत. सर्वच गावगड्यांतील ईकडचे तिकडे करणारे डझनभर उचलेगिरी करणारे संभाव्य जनसेवक आणी दर निवडणूकांना सहा महिन्यांची आश्वासने व हमी देणारांना जनता विसरलेली नाही.
म्हणूनच आता प्रथम योजनामध्ये गावे समाविष्ट करुन, सुप्रमा सोबत पाणी वाटपात गावे बसविलेचे आदेश देण्याची जबाबदारी देखील लोकप्रतिनिधी व सरकारची असून ती मेहरबानी न समजता १५ – १५ वर्षे जनतेने टाकलेल्या विश्वासाला तढा जाऊ देऊ नका असा गर्भित ईशारा आमदार गोरेंचे नाव न घेता देतानाच काही भागांसाठी पाणी आलेचे समाधान असून आमदार गोरेंचे कारकिर्दीतील पाणी पूजनाला व श्रेयायला आमचा विरोध नाही परंतु पाण्यासाठी वंचित असलेल्यांसाठीचा आमचा लढा आहे असे ठणकावत बुधवार दि २१ फेब्रुवारी रोजी जनआंदोलनाला सामोरे जात आहोत जेणेकरुन ज्यांची जबाबदारी आहे अशांना जाणीव करुन देणेचा हा उद्देश असलेचे भोसले यांनी सरतेशेवटी म्हणतानाच पोलीस प्रशासन देशभर जे वागते आहे तेच खेड्यापाड्यांपर्यंत मा.ना.देवेंद्रभाऊंच्या दौर्यासाठी दहिवडी पोलीस आमचे निवेदन स्विकारत नाहीये.अशातच दडपशाहीचा प्रयत्न पोलिस करू पाहत असतील तर मी लोकशाही मार्गाने आमचे हक्क मागताना आंदोलनाच्या हक्कांवरती दहिवडी पोलीसांनी गदा आणू नये.ही वर्तनूक आमचे समजनेपलिकडे असतानाच बाकी बेखील समजनेवालोंको ईशारा काफी है असे उपरोधीक भोसले यांनी म्हटले आहे.
ReplyForward
|