दिवड प्राथमिक शाळा जिल्ह्यात गौरवली नंबर वन*स्वच्छ सुंदर व उपउपक्रमशील व गुणवत्तापूर्ण स्पर्धेत दिवड शाळा अव्वल….
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
By:दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
स्वच्छ सुंदर व उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण स्पर्धेत जिल्हास्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवड या शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला.
माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी ,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी घुले साहेब, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर , प्रा.कविता म्हेत्रे ,, सह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
माणसारख्या दुष्काळी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कोकणासारखी हिरवळीने नटलेली शाळा सर्वांचे लक्ष वेधून घेते. या शाळेत सुसज्ज असलेला हिरवागार बगीचा , त्यामधील विविध फुलझाडे, विविध औषधोपयोगी वनस्पती, परसबाग , पपई , आंबा, सिताफळ, पेरू, डाळिंब, शेवगा, आकर्षन ठरत आहे.
माण तालुक्यातील लहान गटातील इ.1ली ते 4थी च्या शाळांमधून प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. जिल्ह्यातील लहान गटामधधून तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक आलेल्या शाळांमधून सर्वाधिक गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय पाहणी समितीने शाळेचा परिसर, शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, परसबागेतील साहित्याचा पोषण आहारात होणारा वापर, भौतिक सुविधा, शालेय दप्तर , आगीची पाहणी करुन गुणदान केले व त्यामध्ये दिवस शाळा जिल्ह्यात अव्वल ठरत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
त्यांच्या या यशात गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख अशोक गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद खाडे, उपशिक्षक आनंदराव गंबरे, सौ. सुमन गंबरे,अजितकुमार काटकर, आदींनी विशेष परीश्रम घेतले.
या यशाबद्दल त्यांचे सरपंच सौ. अर्चना सावंत,उपसरपंच सतीश घुटुकडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लहूराज सावंत सह. ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
चौकट-
* पाच मुद्दयांच्या आधारे गुणांकन*
शालेय भौतिक सुविधा, शालेय स्वच्छता, विद्यार्थी आरोग्य व परसबाग, लोकसहभाग , शालेय प्रशासन व अभिलेखे जतन , शाळेची गुणवत्ता या 5 गुणांच्या आधारे शाळेची शंभर गुणांचे मुल्यांकन करून या तपासणीत दिवड प्राथमिक शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली.