स्वराज्य गुणीजन गौरव विकास परिषद सातारा, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला,क्रीडा व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असून यांच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक, विद्यार्थी व व्यक्तीचा गुणगौरव समारंभ केला जातो.
स्वराज्य गुणिजन गौरव विकास परिषद यांचे वतीने सन 2024 चा स्वराज्य आदर्श प्रशासकीय जिल्हा क्रीडा अधिकारी पुरस्कार मा. श्री.नितिन तारळकर सो यांना रयत पॅरामेडीकल कॉलेज चे सिइओ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे यांचे शुभहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुणीजन गौरव विकास परिषद सातारा चे अध्यक्ष मा.श्री.अविनाश गोंधळी, उपाध्यक्ष श्री.अक्षय पवार, सचिव श्री.नितिन सुरवसे, शाहू कला क्रीडा राज्य कार्याध्यक्ष सुनील जाधव प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रदीप कांबळे सर जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम ,तालुका क्रीडा समन्वयक गणेश शेंडे उपस्थित होते. सर्वांनी साहेबांचे अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.