परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदवले खुर्द नगरीमध्ये पहिल्यांदाच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ग्रामपंचायत गोंदवले खुर्द युनिफाइट वेल्फेअर असोसिएशन सातारा, यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वी जिल्हास्तरीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धा रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांनी गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून केले श्री. अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन,श्री.नितीन तारळकर सातारा जिल्हा क्रीडा आधिकारी,युनिफाईट चे जिल्हाध्यक्ष डॉ. श्री.संदीपभाऊ शिंदे सीईओ रयत राज, पॅरामेडिकल कॉलेज सातारा, ॲड.श्री. प्रभाकर कारंडे( भाऊ) संस्थापक गोपाल कृष्ण पंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदवले खुर्द सौ. सिंधुताई गाढवे सरपंच ग्रामपंचायत गोंदवले खुर्द, श्री. अमोल पोळ उपसरपंच ग्रामपंचायत गोंदवले खुर्द, श्री. मधुकर मोरे (आबा) चेअरमन गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदवले खुर्द श्री. सुनील जाधव सर राज्य कार्याध्यक्ष राजश्री शाहू कला क्रीडा महासंघ महाराष्ट्र श्री. निजाम नदाफ सर मुख्याध्यापक गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द श्री. प्रसन्न भिसे युवा उद्योजक श्री. मनोज पोळ कै. आबासाहेब पोळ शिक्षण संस्था मार्डी अध्यक्ष, श्री. साहेबराव शेडगे ग्रा. पं. सदस्य, श्री कैलास पोळ ,श्री.राजेंद्र कदम,श्री. प्रमोद पोळ,श्री.अविनाश गोंधळी सर उपाध्यक्ष युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन सातारा, श्री. नितीन सुरवसे सर सचिव युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन सातारा श्री. विजय अवघडे सर संचालक युनिफाईट वेल्फेयर असोसिएशन सातारा श्री सादिक शेख सर क्रीडा शिक्षक व संचालक युनिफाईट वेल्फेयरअसोसिएशन सातारा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.कु.अनुष्का चव्हाण ने सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक सादर केले.कु.प्रेरणा पोळ ने आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्राप्त केला.या स्पर्धेसाठी 10 तालुक्यातून 253 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर ऑफ ट्रॉफी म्हणून इंद्रधनुष्य कराटे क्लब शेंद्रे श्री प्रमोद कदम ,तर दुसरी रनर ऑफ ट्रॉफी म्हणून बिलिमोरिया इंग्लिश मीडियम स्कूल पाचगणी श्री नरेश लोहारा सर व तृतीय ट्रॉफी तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल चे श्री गणेश शिंदे सर यांना देऊन मान्यवरांचे सत्कार करण्यात आला तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री जयवंत जाधव,श्री सचिन तांबे, श्री नंदकुमार मोहिते,श्री अमीन मुल्ला,श्री नितिन तावसे,श्री अक्षय पवार, श्री सुरेंद्र परामणे श्री अनिल शेलार,श्री देविदास माने, श्री लालसाब मुलानी,तर पंच म्हणून आदिनाथ शिंदे,आकाश कांबळे तेजस गायकवाड यश जाधव रेश्मा मुलाणी,वहिदा मुलाणी ,वैष्णवी ढेरे, रसूल मुलाणी ,वैष्णवी माने, सुशांत सत्वधीर, पुरुषोत्तम मोहिते, प्रीती गोंधळी यांनी काम पाहिले ही स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सौ.रागिणी अवघडे, श्री. चव्हाण सर विश्वाछाया मंगल कार्यालय मालक, राम अवघडे, प्रवीण अवघडे,आदिनाथ शिंदे,अजिंक्य अवघडे, आदिती चव्हाण,प्रेरणा गायकवाड, सुप्रिया सुळे, चंद्रकांत लोखंडे, बाबू तुपे, ओकिनावा मार्शल आर्ट ग्रुप चे सर्व विद्यार्थी,विद्यार्थीनी यांचे सहकार्य लाभलेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सादिक शेख सर क्रीडा शिक्षक गोपालकृष्ण विद्यालय गोंदवले खुर्द यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नितीन सुर्वसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. विलास पिसाळ यांनी केले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली.