*विश्र्वतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते “विजयश्री मोफत उपचार कार्डचे वाटप”

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड /अकलूज
           आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनपर जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिव-पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट संचलित ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हाॅस्पीटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने विश्र्वतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना विजयश्री मोफत उपचार कार्डचे वाटप करण्यात आले.
         शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय वेळापूर,शंकरराव मोहिते-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,शिवरत्न शिक्षण संस्था व शिव-पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अंतर्गत महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना विजयश्री मोफत उपचार कार्डचे वाटप करण्यात आले.
            या विजयश्री मोफत उपचार कार्ड अंतर्गत ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हाॅस्पीटल यांच्या तर्फे पोटाचे आजार व उपचार, त्वचा विकार,स्त्रियांचे आजार,पाठीचे आजार व उपचार, डोळ्याचे विकार, पचनसंस्थेचे विकार, हाडांचे विकार, श्वसन संस्थेचे विकार, त्वचा विकार ,किडनी मुत्रा संबंधी, स्त्रियांचे विकार, सौंदर्य विषयक तक्रारी, मानसिक तक्रारी आजार यांसारख्या विविध आजार व विकारावर मोफत उपचार दिले जाणार आहेत.
       सदर कार्यक्रमा प्रसंगी संजय राखले,मच्छिंद्र पगारे,शिवदास शिंदे,धर्मराज दगडे,श्रीकांत राऊत,नितीन बनकर,प्राचार्य डाॅ.अरविंद कुंभार,डाॅ.महेश ढेंबरे,डाॅ.मेरी सुमती ,अश्रफ शेख व इतर मान्यवर व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!