दाढोली ग्रामपंचायती मार्फत विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
चाफळ: प्रतिनिधी श्रीकांत जाधव

दाढोली तालुका पाटण येथील ग्रामपंचायत च्या वतीने दाढोली, मसुगडेवाडी, महाबळवाडी, शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या साहित्याचे वाटप करण्यात आले  असल्याचे प्रतिपादन सरपंच विनोद डांगे यांनी केले.

  यावेळी केंद्रप्रमुख सुरेखा जाधव, उमेश सुतार ,ग्रामसेवक रावते, मुख्याध्यापिका शितल बाबर, तुकाराम डांगे, लक्ष्मण डांगे, अंकुश डांगे, आबासो धावडेकर,अजय डांगे, शरद मराठे, विठ्ठल शिंदे, संजय वळवी, यांची प्रमुख उपस्थिती होती. शितल बाबर म्हणाल्या की, ग्रामपंचायतचे शाळांच्या भौतिक विकासात मोठे योगदान आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने दाढोली, मसुगडेवाडी आणि महाबळवाडी येथे शाळांमध्ये सी .सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांच्या सहकार्याने शाळांमधील अनेक समस्या या मार्गी लागल्या आहेत. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार उमेश सुतार यांचा ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!