व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सुशील यादव
म्हसळा:प्रतिनिधी सन्मानिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि सन्मानिय महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे आणि सन्मानिय विधान परिषद आमदार आनिकेत भाई तटकरे यांचे व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा शहर अध्यक्ष शाहनवाज उकये यांचे संकल्पनेतून माध्यमिक शाळांत परीक्षा २०२४ इयत्ता १० वी च्या परीक्षार्थीना पेन भेट वस्तू देऊन शुभेच्छा देत प्रोस्ताहित करण्यात आले.
हे पेन नसुन विध्यार्थ्यांच्या भाविशाचे छोटस शस्त्र आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा इयत्ता १० चा केंद्र या वेळी न्यु इंग्लिश स्कूल म्हसळा येथे लागल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना म्हसळा आणि एकता सामाजिक विकास ट्रस्ट म्हसळा यांच्या वतीने १० च्या परीक्षार्थीना मोफत पेनाचे वाटप करण्याचे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला न्यु इंग्लिश स्कूलचे प्राचार्य हाके सर, जेष्ठ समज सेवक नवाझ नझिरी, अझर कवारे, असीम चोगले, शिक्षक आणि शिपाई वर्ग या वेळी उपस्थित होते.