व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई: विशेष मुलांना सामान्य मुलांसोबत मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषद मुंबई आणि बृहन्मुंबई शाखेच्या संयोजनात एक दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यहाँ के हम सिकंदर या नावाने ओळखला जाणारा हा महोत्सव शनिवार, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (पश्चिम) येथे होणार आहे.
या कार्यक्रमात विशेष मुलं आपली कला सादर करणार आहेत. नृत्य, गायन, नाट्य यांसारख्या विविध कला प्रकारांचा समावेश असलेल्या या महोत्सवात, दिव्यांग मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच या मुलांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्रीही या ठिकाणी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत अॅड. निलम शिर्के – सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद) आणि विशेष उपस्थितीत शैलेश गोजमगुंडे (उपाध्यक्ष, मध्यवर्ती शाखा) व नागसेन पेंढारकर (प्रमुख कार्यवाह, नंदुरबार शाखा) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सर्व पत्रकार, नागरिक आणि कलेप्रेमी यांना विनंती करण्यात येत आहे की, या अनोख्या महोत्सवात सहभागी होऊन दिव्यांग मुलांचा उत्साह वाढवावा.