धुळदेव येथील श्री म्हंकाळेश्वर विद्यालयचा उत्साहात दिंडी सोहळा साजरा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
धुळदेव, ता. माण : प्रतिनिधी
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित श्री म्हंकाळेश्वर विद्यालय, धुळदेव येथे शालेय उपक्रमांतर्गत दिंडी सोहळा उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान केली होती. विशेष आकर्षण ठरले ते विठ्ठल व रुक्मिणीच्या वेशातील दोन विद्यार्थिनी. वारकरी वेशातील इतर विद्यार्थ्यांनी फुगडी, पारंपरिक नृत्य, टाळ-मृदुंगाचा गजर करत श्री क्षेत्र म्हंकाळेश्वर अवतार धुळोबा देवस्थान परिसरात आनंदमय वातावरणात दिंडी काढली.
या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पावरा आर. यु. सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळा धुळदेव येथील शिक्षक, विद्यार्थी, आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपूर्ण गावात भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
वारकरी संप्रदायाचे महत्त्व व संस्कृती जपणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावासोबतच सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक होत आहे, असे उपस्थितांनी नमूद केले.