पानवन शाळेचे डिजिटल रूपांतर; मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण”
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड, – प्रतिनिधी
पानवन येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या आयडियल सेंटर लोकार्पण सोहळा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा.ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील या शाळेने गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत घडवून नाव मिळवल्याचे गौरवोद्गार मंत्री गोरे यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी शमीमबानू तांबोळी, केंद्रप्रमुख दीपककुमार पतंगे, माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, लाडकी बहीण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, भाजप मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड, अखिल काझी, सोमनाथ भोसले, सरपंच सौ. जयश्री शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा शिंदे, पराग शिंदे, मुख्याध्यापक सुभाष गोंजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री गोरे पुढे म्हणाले, “जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची घटती संख्या ही राज्यपातळीवरील गंभीर बाब आहे, मात्र पानवन शाळेने यामध्ये अपवाद ठरवत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० विद्यार्थ्यांची वाढ केली आहे. ही अभिमानास्पद बाब असून, भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्येही येथील विद्यार्थी यशस्वी होतील, असा विश्वास आहे.” त्यांनी ग्रामस्थ आणि पालकांना शाळेच्या गुणवत्तापूर्ण प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी शासनाच्या वतीने लाखो रुपयांच्या निधीतून शाळेस डिजिटल व व्हर्च्युअल क्लासरूम, इंट्रॅक्टिव बोर्ड आदी आधुनिक सुविधा दिल्या असून, या सुविधांचा योग्य वापर होण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेच्या पाठीशी उभं राहण्याची गरज व्यक्त केली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी शाळेच्या गुणवत्तेच्या टिकावासाठी पालकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक सुभाष गोंजारी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा देताना विद्यार्थ्यांची वाढ, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, तसेच ग्रामस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेल्या भौतिक सुविधा, फर्निचर, बाला पेंटिंगविषयी माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व शिक्षकांचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात शाळेस कमान भेट दिल्याबद्दल पराग शिंदे यांचा सत्कार मंत्री गोरे यांच्या हस्ते झाला. तसेच आदर्श अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शाळेतील सर्व शिक्षक आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे, उपसरपंच चांगुणा शिंदे, किरण बोराटे, जावेद मुल्ला, अनिल पाटोळे, राजीव हत्तीकर, दादासो नरळे, गोरख शिंदे, संभाजी शिंदे, धुळेश्वर शिंदे, शंकरशेठ तुपे, नानासो नरळे, पोपट शिंदे, दत्तात्रय शिंदे, नाना शिंदे यांच्यासह गावातील व केंद्रातील शिक्षक, विद्यार्थी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजाराम तोरणे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभारही त्यांनीच मानले.