व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड (सातारा ) डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय महामेळावा येत्या २५ मे रोजी (रविवार) पुणे येथील JW Marriott Hotel या नामांकित ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. हा निर्णय पुण्यात पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
या महामेळाव्यात “महाराष्ट्र महागौरव” पुरस्कारांचे वितरण तसेच पत्रकारांच्या मुला-मुलींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपली नावनोंदणी सोमवार, दिनांक १९ मे २०२५ पर्यंत जिल्हाध्यक्षांकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदवण्यासाठी ९६२३८०८६७० या मोबाईल नंबरवर आपले संपूर्ण तपशील व्हॉट्सॲपद्वारे पाठवावेत.
या महामेळाव्यासाठी सातारा जिल्हाध्यक्ष श्री. संतोष दिनकर शिराळे (रा. वहागाव, पो. रांजणी, ता. जावली, जि. सातारा, मोब.: ९६२३८०८६८०) हे जिल्ह्यातील संयोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत. श्री. शिराळे हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य चे सातारा जिल्हाध्यक्ष असून ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन चे जिल्हा प्रतिनिधी आणि शिव विजय चे संपादक आहेत. त्यांचे टाइम्स ऑफ यंग व्हॉईस हे पोर्टल/चॅनल देखील कार्यरत आहे.