धुळदेवच्या सायली कोळेकरची राज्यस्तरावर निवड — गावभरातून अभिनंदनाचा वर्षाव!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:- प्रतिनिधी

महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगली यांच्या अधिपत्याखालील श्री म्हंकाळेश्वर विद्यालय, धुळदेव या प्रशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

   दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी, जिल्हा रत्नागिरी येथील एस.व्ही.जे.सी.टी. क्रीडा संकुल, डेरवन येथे पार पडलेल्या विभागीयस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनी कु. सायली सागर कोळेकर हिने १७ वर्षाखालील मुलींच्या गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरावर पात्रता मिळवली.

    या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय गुरुवर्य श्री. आर.एस. चोपडे सर, उपाध्यक्ष श्रीमती एल.टी. शेंडगे मॅडम, सचिव श्री. एस.ए. पाटील सर, खजिनदार श्री. एस.व्ही. अनुसे सर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सायलीचे अभिनंदन केले.

       तसेच माण तालुक्याचे बहुआयामी क्रीडा शिक्षक, वेलनेस कोच व माण तालुका शारीरिक शिक्षण संघाचे अध्यक्ष श्री. महेश बडवे सर, तालुका गटशिक्षणाधिकारी मा. लक्ष्मण पिसे सर, केंद्रप्रमुख श्री. पतंगे सर (म्हसवड नं. ०२), प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.यू. पावरा सर, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामपंचायत धुळदेवचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी सायलीचे मनःपूर्वक अभिनंदन करून राज्यस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या या यशामुळे धुळदेव गावाचा आणि माण तालुक्याचा अभिमान पुन्हा एकदा उंचावला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *