धनगर आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी माण मधील धनगर समाज आक्रमक “

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी
धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणी होण्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत मागितली होती ती संपली असून धनगर आरक्षणाचा मुद्यांचा सरकारला विसर पडला असून सरकारला जाग आणण्यासाठी म्हसवड ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा सकल धनगर समाज बांधवांनी  काढली असून या पदयात्रेचा शुभारंभ येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथाचे दर्शन घेऊन करण्यात आला.
         सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील धनगर बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे म्हणून काही दिवसापूर्वी दहिवडी येथे आमरण उपोषण केले होते त्यावेळी सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपोषण करताना लेखी पत्र देऊन 50 दिवसांची मुदत मागून घेतले होते सदर आंदोलनावेळी पालकमंत्र्यांनी दिलेल्या मुदतीचे 50 दिवस संपून वरती दहा दिवस पूर्ण झाले तरी अजून पर्यंत धनगर बांधवांना आरक्षण न मिळाल्यामुळे संतप्त समाज बांधवांनी आज येथील सिद्धनाथ मंदिर येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन  पदयात्रेला प्रारंभ केला ही पदयात्रा मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे पदयात्रेमध्ये धनगर आरक्षण उपोषण करते शरद गोरड तायाप्पा गोरड वैभव गोरड यांच्यासह डॉक्टर महेश माने डॉक्टर वसंत मासाळ डॉक्टर प्रमोद गावडे प्रशांत विरकर शंकर इंगळे बाळराजे वीरकर शिवाजी बरकडे मराठा क्रांती मोर्चा चे गणेश काटकर व माण तालुक्यातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर पद यात्रेच्या मार्गातील गावातील नागरिकांनी पदयात्रेतील चालणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे स्वागत केले.
    पदयात्रा लोधवडे हद्दीमध्ये गेल्यानंतर लोधवडे गावातील नागरिकांनी उपोषणकर्त्यांचे शाल श्रीफळ व हार घालून जंगी स्वागत केले. सदर पदयात्रेला माण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांनी पाठिंबा देऊन मराठा धनगर भाऊ आरक्षणाचा लढा एकत्र देऊ अशा घोषणा दिल्या.
     आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत शेकडो समाज बांधव पदयात्रेमध्ये सामील झाले सदरील पदयात्रा आज मंगळवारी वाघमोडेवाडी गावामध्ये मुक्कामास आहे सदर मुक्कामाच्या वेळी माण तालुक्यातील विविध समाज बांधवांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
चौकटनिघून गेला मागितलेला वेळ… घाला धनगर आरक्षणाचा मेळ…अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!