डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय पानसांडे 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सातारा 
 डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी म्हसवड येथील सुपूत्र व माण चौफेर न्युजचे उपसंपादक व प्रसिद्ध फोटोग्राफर धनंजय पानसांडे यांची बिनविरोध झाल्याची घोषणा सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी केली.
        या बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले , राज्य सहसचिव संजय कदम, राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे , माजी अध्यक्ष सचिन जाधव , सोमनाथ साखरे, संतोष शिराळे, जिल्हा सचिव राहुल ताटे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमोल टकले , जिल्हा कोषाध्यक्ष संदीप माने,  माण तालुका अध्यक्ष फिरोज तांबोळी, उपाध्यक्ष लिंगराज साखरे , सचिव बापूसाहेब मिसाळ , सचिन शिंगाडे यांची उपस्थिती होती.
        धनंजय पानसांडे यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माण तालुका अध्यक्ष फिरोज तांबोळी, उपाध्यक्ष लिंगराज साखरे , सचिव बापूसाहेब मिसाळ , खजिनदार संदीप जठार , पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लालासाहेब दडस , एल .के. सरतापे , रुपेश कदम , महेश कांबळे , एकनाथ वाघमोडे , विशाल माने , राजू केवटे आदी पत्रकार उपस्थित होते.
              डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे राज्यातील ५ हजारहून अधिक युट्युब चॅनेल व वेब पोर्टलचे संपादक पत्रकार सभासद असलेल्या देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेने डिजिटल मीडियातील संपादक पत्रकारांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडून त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
    ज्येष्ठ माध्यम तज्ञ संपादक राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ही संघटना मोठ्या ताकतीने कार्यरत आहे. मंगळवार दि २ ऑगस्ट रोजी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय पानसांडे यांची बिनविरोध निवड केली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!