महिला कुस्ती संकुलामुळे शिंगणापूरच्या विकासात भर — सुभाष नरळे
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
शिखर शिंगणापूर-—/
शिंगणापूर याठिकाणी उभा रहात असलेल्या आदिती महिला कुस्ती संकुलाचा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे शिंगणापूरच्या विकासात भर पडणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांनी केले.
शिंगणापूरचे माजी सरपंच अभय मेनकुदळे यांच्या प्रयत्नातून शिखर शिंगणापूर याठिकाणी महिला कुस्ती संकुल उभा रहात असून या संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा कुस्ती संघाचे उपाध्यक्ष संदीप मांडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे, युवा नेते संदीप पोळ, मनोज पोळ आदी उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही प्रभाव वाढत असून कुस्तीसारख्या राकट खेळामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. महिला कुस्तीपटूसाठी पहिले कुस्ती संकुल शिंगणापुरात सुरू होत असून यामुळे शिंगणापूरच्या विकासात भर पडणार असल्याचे सुभाष नरळे यांनी सांगितले. तर अभय मेनकुदळे यांच्यामार्फत जिल्ह्यातील पहिले महिला कुस्ती संकुल उभा राहत असून यामुळे माण खटावमधील महिला कुस्तीपटूंची सोय होणार आहे. ते ऑलम्पिक दर्जाचे व्हावे या संकुलासाठी कुस्ती संघाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू असे संदीप मांडवे यांनी सांगितले. यावेळी बंडा गोडसे, संदीप पोळ, अभय मेनकुदळे, दीपक तंडेबडवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वीरभद्र कावडे यांनी केले तर आनंद बडवे यांनी आभार मानले. यावेळी वीरभद्र कावडे, डॉ. अतुल बंदुके बाळासाहेब भोसले, मोहन बडवे, मंगेश सोनवणे, सुभाष ठोंबरे प्रकाश कुंभार यासह शिंगणापूर मोही परिसरातून क्रीडाप्रेमी उपस्थित होते.