व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड :प्रतिनिधी
देवापूर:
देवापूर ता. माण येथे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून दिवसा अपरात्री नागरिकांचा कानोसा घेऊन चोऱ्या केल्या जात आहेत. गाव परिसरात गेल्या सहा महिन्यां पासून भुरट्या चोरांनी आपली दहशत निर्माण केली आहे.
त्यामूळे तेथील रहिवाश्यांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. भुरट्या चोरांचा बंदोबस्त पोलीस यंत्रणेने लावावा अशी मागणी जोर धरत आहे.तरी गावात दहशतीचे वातावरण निर्माण करु पाहणार्या अज्ञात, भुरट्या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त पोलीस यंत्रणेने लावावा अशी मागणी जोर धरत आहे.
विद्युत मोटारी, मोटार सायकली, पाळीव प्राणी, शेतातील पिके, फळे वाहनांच्या बॅटरी, स्टेपणी , डिझेल, पेट्रोल चोरून परगावात सदरचे साहित्य विकणारी टोळी कार्यरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
देवा पूर मध्ये चौकाचौकात सी. सी टी. व्ही असून देखील भुरटे चोर दिवसा उन्हाळ्याचा फायदा घेऊन रेकी करून रात्री अप रात्री डल्ला मारत आहेत.सदरचे टोळके हे स्थानिक असल्याची शंका नागरिक व्यक्त करत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात नजीकच्या म्हसवड पोलीस स्टेशन ला स्थानिक नागरिकांनी अवगत केले आहे.अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.