आमदार रविंद्रभाऊ धंगेकर यांचा देवापूर मध्ये नागरी सत्कार
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
विशाल माने
देवा पूर :प्रतिनिघी
कसबा पेठ पुणे विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्रभाऊ धंगेकर यांचे माण तालुका दौऱ्यावर असताना समर्थकांनी जंगी स्वागत केले. त्यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमातून वेळ देत देवापूर येथील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या.देवा पूर ग्रामपंचायत, शेती सोसायटी, माणगंगा विकास सोसायटी पळ सावडे, विकास सेवा सोसायटी देवापूर ,पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत भवन याठिकाणी त्यांचा नागरी सत्कार घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी शिवाजीराव आडळे, यशवंत काळेल, प्रणव धंगेकर, अभयसिंह जगताप, सुनील बाबर, शहाजी बाबर,सुभाष नरळे, बाबासाहेब माने, बाबासाहेब बनसोडे, अरुण सावंत, रावसाहेब बाबर, रवींद्र नरळे, विजय जगताप, ज्ञानदेव बाबर,कृष्णराव बाबर, शिवाजी माने, सुरेश बाबर, हेमंत बाबर, दिलीप खरात, सुनिल थोरात, भागवत पिसे, शहाजी ढेरे , कैलास कांबळे यांच्यासह माण मधील महा विकास आघाडीतील पदाधिकारी, हितचिंतक उपस्थीत होते.
उपस्थितांसमोर बोलताना आ. रविंद्र धंगेकर म्हणाले की, देवा पूर सह माण तालुक्यातील बांधव वर्षानुवर्षे माझ्या मतदारसंघात नोकरी व व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत. माण चे व माझे एक अतूट नाते आहे. कसबा निवडणुकीतील विजयात माण देशातील कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा असून हक्काच्या नात्याने इथल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्य तत्पर राहिन. कसबा निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीची हत्त्या कशा पद्धतीने होते? हे अखंड महाराष्ट्राने पाहिले. विरोधकांनी सर्व बळाचा वापर करून पाहिला. पण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुमच्यासारखी लोक माझ्या मदतीला आली. आणी कसब्यात इतिहास घडला. याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या मतदारसंघातील मतदार व माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी आपल्यासारख्या माणसांना देतो. देवा पूर करानी केलेला सत्कार चिरंतर माझ्या मनात राहील असे मत व्यक्त करुन देवा पूर करांचे आभार मानले.

