व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड….प्रतिनिधी माण २५८ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांच्या उमेदवाराची मागणी माण तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई यांच्याकडे केली आहे.
टिळक भवन मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांच्याकडे प्रा.विश्वंभर बाबर यांनी माण तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळा सह पक्षाचा अधिकृत उमेदवारी मागणी अर्ज व निवेदन सुपूर्द केले . महाविकास आघाडी अंतर्गत माण विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे घेऊन प्रा. विश्वंभर बाबर यांना राष्ट्रीय काँग्रेस ची उमेदवारी देण्याची मागणी म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे , माजी सभापती व तालुका एस सी विभागाचे अध्यक्ष विजय बनसोडे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आटपाडकर, माण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तसेच उपाध्यक्ष आर पी काटकर, देवापूरचे सरपंच मंगल बनसोडेवसंतराव शिर्के,युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला तसेच गणपतराव खाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
विश्वंभर बाबर उच्च विद्या विभूषित असून त्यांना कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हे तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व कृषी क्षेत्रा च्या माध्यमातून चांगला जनसंपर्क व संघटन असल्याने प्रा. बाबर यांच्या उमेदवारीचा अग्रक्रमाने विचार व्हावा ही मागणी शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना विश्वंभर बाबर म्हणाले लोकशाहीत पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. अंतिम आदेश माननीय नानाभाऊ पटोले व मा. पृथ्वीराज चव्हाण यांचा मानणार असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी सांगितले