अहिंसा पतसंस्थेकडून महिंद्रा कंपनीच्या जितो या चार चाकी वाहणाचे वितरण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड 
.म्हसवड येथील नामवंत असणाऱ्या अहिंसा पतसंस्थेने स्थापनेपासून आपला ऑडिट वर्ग अ जपला असून गरजू कर्जदारांना कर्ज देणे व त्याची नियमितपणे परतफेड करून घेणे हे जनु संस्थेचे ब्रीद बनले आहे “सहकारातून सेवा ” या ब्रीद वाक्याप्रमाणे सर्व सामान्य लोकांना कर्ज स्वरूपात मदत करणे हे अहिंसा पतसंस्थेने गरजू लोकांसाठी उभारलेले एक भांडारच आहे अशी प्रतिक्रिया श्री महादेव कवडे यांनी व्यक्त केली.
   यावेळी बोलताना अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले की अहिंसा पतसंस्था ही सर्वसामान्याचीच संस्था असून चांगले कर्जदार ही संस्थेची संपत्ती आहेत.त्यांनी वेळेवर कर्ज फेडल्यामुळेच संस्थेची भरभराट होत असते.
या वाहन वितरणावेळी, संस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ, उप व्यवस्थापक आहेरकर, तसेच संस्थेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!