राज्याच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला म्हणजे आमचा सेक्युलरिज्म कमी झाला असे होत नाही- खासदार सुनिल तटकरे
व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
म्हसळा – सुशील यादव
राज्यात आणि देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीए(महायुतीच्या )सरकार मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याने आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांपासून दूर जात असल्याची दिशाभुल करण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहु,फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारधारेच्या माध्यमातुन सर्वधर्म समभाव जोपासत सर्वांगीण विकास करण्याचे दृष्टीकोन ठेवून राज्याच्या महायुतीमध्ये सहभागी झाला असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रांताध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथे पत्रकारांजवळ वार्तालाप करताना स्पष्ट केले.
म्हसळा शासकीय निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत खासदार सुनिल तटकरे यांनी अधिकपने खुलासा करताना पक्षाचे नेते,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेश झाले नंतर त्यांनी अर्थ मंत्री पदाची जबाबदारी घेतल्यावर गाव वाडी वस्ती आणि नगराचे विकास कामांसाठी किमान ८०० ते ९०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.या मध्ये अल्पसंख्यांक विभागाला वेगळ्या निधीची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती देताना वक्फ बोर्डाच्या मागणी नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी एकत्रत्रितपणे अल्पसंख्यांक समाजातील सर्वांगीण विकास कामांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाला १ हजार कोटी रूपयांचे निधीचा भागभांडवल वाढवला आहे.
रायगड जिल्ह्याती श्रीवर्धन,म्हसळा,माणगाव,महाड,मंडणगड तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील गावांत विकास कामांसाठी १३.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी विकास कामांची यादी प्रसिद्ध करताना सांगितले.या विकास निधीत म्हसळा तालुका अल्पसंख्यांक समाजातील गाव वाडीच्या विकासासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आयोजीत पत्रकार परिषदेत खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,अल्पसंख्याक समाजाचे जिल्हा अध्यक्ष नाझिम हसवारे,नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर,माजी नगराध्यक्ष असहल का,जयश्री कापरे,शहर अध्यक्ष रियाज घराडे,महीला अध्यक्षा शगुप्ता जहांगिर,रफिक घरटकर,नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सुनिल तटकरे यांनी वार्तालाप करताना विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नसल्याचे आश्र्वासन देत मतदार संघात दोन दिवसांत २० कोटी रुपयांचे विकास निधीची यादी २५:१५ मधून उपलब्ध होणार आहे.बजेट आणि ओडीआर मधुन ग्रामीण मार्ग,जोड रस्ते बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार आहे.मंत्री आदिती तटकरे यांनी शासन स्तरावर तर केंद्रीय स्तरावर खासदार म्हणून करोडो रुपयांचा विकास निधीची कामे करून मतदार संघात मागील २५ वर्षे विकासाची पडलेली ठिगळ आता भरून काढली असल्याचा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी केला.पत्रकारांनी खासदार सुनिल तटकरे यांना तुमच्या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघात त्याच बरोबर मावळ आणि सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपने उमेदवारीवर दावा केला असल्याचा प्रश्न विचारला असता त्या वर तटकरे यांनी उत्तर देताना राज्यस्तरावर मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमचे पक्ष नेते अजित पवार,महायुतीचे पक्ष नेते एकत्रित बसून यावर योग्य तो सिक्कामोर्तब होणार आहे.देशस्तरावर केंद्रीय नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन चार दिवसांत निर्णय घेऊन संधी उपलब्ध झाल्यास आपण रायगडची लोकसभा निवडणुक लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला.महायुती मधील पक्ष कार्यकर्त्यांचा योग्य वेळी मनोमिलन आम्ही सारेजण करू आणि सर्व जण एकत्रित पणे निवडणुकीला सामोरे जावून राज्यात ४५ + खासदार निवडून आणणार असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी वार्तालाप करताना सांगितले.
चौकट
मतदारसंघात अल्पसंख्यांक समाजातील गाव वाडीच्या विकासासाठी १३.५० कोटी रुपयांचे निधीची मंजुरी.
# महायुतीचा उमेदवार म्हणून रायगड लोकसभा निवडणुक लढविणार असल्याचे केले जाहिर.